भाजपला धक्का : महापालिकातील नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगरसेवकांचे पक्षांतर सुरू आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या एका नगरसेविकेने भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव महानगरपालिकेत नगरसेवकांचे पक्षांतर सुरू आहेत. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने बहुमत अधिक घट्ट होत आहे. गेल्या आठवड्यात भाजपाचे नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. असे असतांना आज सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी अजिंठा विश्रामगृह येथे भाजपच्या प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेविका रूकसानाबी गबलू खान यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा खिंडार पडली आहे.

 

पक्ष प्रवेश प्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, कुंदन काळे यांच्यासह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content