चप्पल उतरवण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी; परस्पर विरोध गुन्हे दाखल

जळगाव प्रतिनिधी । संकट उतरवण्यासाठी आपल्या घराच्या दरवाजाजवळ चप्पल उतारल्याचा कारणावरुन दोन कुटुंबियांनी आपसात भांडण केले. एकाने पोलिसात तक्रार केल्याचा राग आल्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबिय आपसात भिडल्याची घटना शाहुनगरात ही घडला घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अर्शद रफीक पिंजारी (वय २२, रा.शाहुनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी स्वत:च्या घराच्या दरवाजा जवळ चप्पल उतरवली (संकट टळण्यासाठी अंधश्रद्धेने केली जाणारी कृती) होती. या कारणावरुन शेजारी राहणारे आरीफ कालु पिंजारी, मुमताज कालु पिंजारी, रुकसार बी आरीफ पिंजारी, रमजान कालु पिंजारी, शोएब रमजान पिंजारी व इतर तीन जणांनी पडद्याच्या लोखंडी रॉडने अर्शद यांना मारहाण केली. उजव्या गालावर व डाव्या हाताच्या अंगठ्यावर चावा घेतला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अर्शद यांच्या आईस देखील मारहाण व शिवीगाळ केली. यानंतर जखमी अर्शद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अर्शद यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या फिर्याद मुमताजबी कालु पिंजारी यांन दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ जून रोजी अर्शद याच्या विरुद्ध पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या कारणावरुन १५ जून रोजी अर्शद रफीक पिंजारी, आफताब रफीक पिंजारी, आबीद हसन पिंजारी, अनवर हसन पिंजारी, इकबाल सुपडू पिंजारी, अलिशानबी रफीक पिंजारी, सायमा फैजल पिंजारी, रफीक मुनाफ पिंजारी यांनी घराबाहेर गर्दी केली. यानंतर लोखंडी पाईप, ब्लेड व झाडुने हल्ला चढवत आरीफ पिंजारी, इग्रान पिंजारी, रुखसार पिंजारी यांना मारहाण करून महिलांशी गैरवर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content