फैजपुरात भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांना श्रध्दांजली

फैजपूर ता यावल प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षातर्फे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिवंगत माजी खासदार हरीभाऊ जावळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आमदार नामदार हरिभाऊ जावळे यांच्या दुःखद निधन बद्दल कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शोक व्यक्त केला. आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करताना अनेकांना गहिवरून आले सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा पितृतुल्य नेता देवाने हिरावून घेतल्याने यावल तालुका नेतृत्वाला पोरका झाला आहे. त्यांचे सर्वसामान्य व कार्यकर्त्यांचे काम करण्याची तळमळ, तालुका यावल रावेर सह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा ध्यास महाकाय पुनर्भरण योजना, जलक्रांती अभियान थेंब हा अमृताचा, केळी प्रकल्प, शेळगाव बॅरेज, मोर प्रकल्प असे एक ना अनेक विकास कामे सर्वांच्या सदैव स्मृतीत राहील मजबूत पक्षसंघटन व सर्वसामान्यांच्या सेवे सह या भागाचा विकास साध्य करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना श्रद्धांजली अर्पित करणे ठरणार असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. सभेच्या शेवटी सामूहिक शांतीमंत्र म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली
याप्रसंगी नगराध्यक्ष महानंदाताई होले. माजी जि.प. सदस्य भरत महाजन, माजी नगराध्यक्ष पी. के. चौधरी, निलेश राणे, यावल तालुका शेतकी संघाचे संचालक नरेंद्र नारखेडे व नितीन नेमाडे, माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे ,भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, दीपक होले,महिला शहराध्यक्ष जयश्री चौधरी, रशिद तडवी ,पप्पू चौधरी, बबलू महाजन, नितीन पाटील, राजाभाऊ चौधरी, वसंत परदेशी, नरेंद्र चौधरी, प्रतीक वारके ,विनोद कोल्हे, योगेश भावसार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान, उद्या दिनांक १८ जून रोजी कृषी उत्पन्न उपबाजार समिती फैजपूर येथे सर्व पक्षीय श्रद्धांजली सभा चे आयोजन करण्यात आले आहे. ते उद्याच कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे दुपारी ४ वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Protected Content