यावल कृउबातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी २१ हजाराची मदत

यावल प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोरोग्रस्तांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ हजार रूपयाचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशात थैमान घातले आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र समाजसेवक दानसुर विविध संस्था संकटासमयी शासनास विविध मार्गाने मदतीस सरसावले असुन यावल येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (कोविड -१९) २१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य म्हणुन योगदान देण्यात आले. यावल कृषी बाजार समिती सभापती तुषार पाटील यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.

Protected Content