यावल तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

यावल,प्रीतीनिधी । कोरोना या घातक संसर्गजन्य आजाराने यावल तालुक्यात फैजपुरमार्गाने शिरकाव केला असुन मागील चोवीस तासात पाच रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. आता फैजपुरचे दोन रुग्ण हे देखील पॉझीटीव्ह आल्याने एकुण बाधीत रूग्णांची संख्या सातवर पहोचली असल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये आपल्या आरोग्याच्या प्रती चिंता वाढवणारी ही बातमी असुन सर्वत्र खळबळ उडाली असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मागील पन्नास दिवसापासुन महाराष्ट्र राज्यासह देशाला कोरोना विषाणुच्या या संसर्गजन्य आजाराने विळखा घातला आहे. बाधीत रुग्णांची संख्या ही प्रचंड वेगाने वाढत असुन सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, यावल तालुक्यात मागील पन्नास दिवसांपासून एकही रुग्ण नव्हता. मात्र, आठ ते दहा दिवसापुर्वीच फैजपुरच्या सिंधी कॉलनीतुन दोन रुग्ण मिळाल्यापासुन सुरुवात झाली असुन आता कोरोना बाधीतांची संख्या फैजपुर दोन , कोरपावली दोन , यावल शहरातील पुर्णवाद नगरमधील एक महीला, सुर्दशन चित्र मंदीर परिसर एक २०वर्षीय तरूणाचा यांचा समावेश आहे. तसेच दहीगाव येथील ६७ व्याक्तिचा अहवात पॉझीटीव्ह आला आहे. कोरपावली गाव पुर्णपणे कंटेंनमेंट झोन घोषीत करण्यात येवुन पुर्ण गाव सिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर यावल शहरातील फैजपुर रोडवरील पुर्णवाद नगर देखील कंटेंनमेंट झोन म्हणुनl सिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुर्दशन चित्र मंदीर परिसर देखील खबरदारीचा उपाय म्हणुन सिल करण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावर विभागाचे प्रांत आधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी व त्यांचे सर्व कर्मचारी, यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यावल शहर पोलीस पाटील मिलींद गजरे हे आपले जिव धोक्यात घालुन अहोरात्र अथक परिश्रम घेवुन नागरीकांच्या आरोग्याला घेवुन विशेष जनजागृती करीत असल्याचे दिसुन येत आहे.

Protected Content