कोरपावलीचे ग्रामसेवक सपकाळे यांना बदली झाल्याने निरोप तर रवींद्र बाविस्कर यांचे स्वागत

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप आणि त्यांच्या जागी  रुजु झालेले आर .टी .बाविस्कर यांचे स्वागत करण्यात आले आहे.

 

कोरपावली ग्रामपंचायतीवर मागील ४ वर्ष उत्कृष्ट सेवा करून विनंती बदली करून बोदवड तालुक्यातील जुनोने ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक प्रवीण सपकाळे म्हणुन गेल्याने त्यांना शाल, श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. तर विरावली ग्रामपंचायतमध्ये कार्यरत  ग्रामसेवक आर. टी. बाविस्कर यांच्याकडे कोरपावली ग्रामपंचायतीचा प्रभारी पदभार दिल्याने त्यांचे ही याप्रसंगी स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सत्ताधारी गटाचे प्रमुख मार्गदर्शक पिरण पटेल, सामाजिक कार्यकर्ते नारायण अडकमोल,  ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल, कोरपावली ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, युवा समाजसेवक मुक्तार पटेल, काँग्रेस कमेटीचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, रोहित अडकमोल, सिकंदर तडवी, ग्राम पंचायतचे कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी आदी ग्रामस्थ मंडळी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान कोरपावलीहुन बदलुन गेलेले ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांनी आपल्या चार वर्षाच्या कार्यकाळात ग्रामस्य तथा आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी तथा कार्यालयीन सहकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल भावुक मनाने सर्वांचे आभार मानले.

 

Protected Content