दिल्ली , महाराष्ट्र , ओडिसा , राजस्थान , जम्मू काश्मीरात १ मेपासून कोरोना लसीकरण प्रारंभ अशक्य

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यांचं संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे दिल्ली , महाराष्ट्र , ओडिसा , राजस्थान , जम्मू काश्मीरात १ मेपासून कोरोना लसीकरण प्रारंभ अशक्य असलयाचे स्पष्ट झाले आहे

 

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही  स्पष्ट केलं आहे की दिल्लीमध्ये सध्या लसी उपलब्ध नाहीत. दिल्ली सरकारने लसींचा तुटवडा असल्याची माहिती दिली आहे. दिल्ली सरकारसोबतच ओडिसा आणि जम्मू काश्मिर सरकारनेही १ मे पासून लसीकरणाला सुरुवात करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

 

“दिल्लीमध्ये सध्या लसी उपलब्ध नाहीत. आम्ही कंपन्यांकडे लसींची मागणी केली आहे. जेव्हा त्या उपलब्ध होतील तेव्हा पुढील माहिती दिली जाईल”, असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीसोबतच महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनीही त्यांच्याकडे लसी उपलब्ध नसल्याने १ मे पासून लसीकरण सुरु करता येणार नसल्याचं सांगितलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज   बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसह इतर सर्व अधिकारी या बैठकीत सहभागी होतील.

 

सत्येद्र यांनी सांगितलं की, गेल्या दीड महिन्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत या प्रमाणात घट झाली आहे ही एक आशादायी गोष्ट आहे.

 

ओडिसा सरकारही १ मेपासून लसीकरण सुरु करणार नसल्याचं समोर येत आहे. राज्यात लसींचा पुरवठा उशीरा होणार असल्याने १ मेपासून लसीकरणाला सुरुवात करणं शक्य नसल्याचं समोर येत आहे. सध्या १२ जिल्ह्यातलं लसीकरण बंद पडलं आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मिरमध्येही लसींची मागणी केली असून त्यांना अद्याप पुरवठा झालेला नाही. २० मेपर्यंत तिथे लस पोचणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतरच लसीकरणाची सुरुवात होऊ शकते.

Protected Content