कांदा भाववाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे संसदेच्या आवारात आंदोलन

EK 9KpmUUAIKIdB

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कांद्याच्या वाढत्या दरांविरोधात आज कॉंग्रेसने संसदेच्या आवारात आज सकाळी आंदोलन केले. या आंदोलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि नुकतेच जामिनावर सुटलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही सहभाग नोंदवला.

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस नेते अधीर चौधरी, गौरव गोगोई, अहमद पटेल आणि इतर खासदारांनी कांद्याच्या वाढत्या किंमतीचा निषेध गुरुवारी संसदेच्या आवारात नोंदवला. सरकारने कांद्याचे भाव कमी करावेत आणि गरिबांचा छळ करणे थांबवावे, अशी मागणी करणारे बॅनर लावून घोषणाबाजी केली आणि कांद्याच्या टोपली घेऊन काँग्रेसच्या खासदारांनी निषेध केला. ‘कैसा है यह मोदी राज, महंगा राशन, महंगा प्याज’, ‘महंगाई की प्याज पर मार, चूप क्यूं है मोदी सरकार’ अशी टीका बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली.

Protected Content