कोरोना : तपासणी मोफत करण्यात यावी ; सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही, याची तपासणी मोफत करण्यात यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिली आहे.

सरकारने कोरोना टेस्टला लागणाऱ्या फीससंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या तपासणीची फी अधिक आहे. त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अॅव्होकेट शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यामूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही, याची तपासणी मोफत करण्यात यावी. तसेच एखाद्या व्यक्तीकडून अधिक फीस घेतली गेली असतील, तर ती त्या व्यक्तीला सरकार परत करेल.

Protected Content