उध्दव ठाकरेंना हवा राजकीय पौष्टीक आहार ! :भाजपने उडविली खिल्ली !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाड येथील सभेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करत त्यांची खिल्ली उडविली आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सैनिकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह समर्थ आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या आयुष्याचं मातेरं केलं. हिंदुत्वाच्या बाबतीत ते तीच ती कॅसेट लावत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या लाचारीसाठी ते बसत आहेत. तसेच दरेकर यांनी निवडणुकांवरून देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्या पौष्टिक आहाराची गरज आहे. मोठ्या संख्येनं आमदार, खासदार निघून गेले आहेत. कुस्ती करायची तर आधी सैन्य तरी जमवा. तुम्ही कुस्ती करायच्या आधीच चितपट झाला आहात असे म्हणत त्यांनी खिल्ली उडविली.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवारांना अजित पवार यांना धडा शिकवायचा होता, त्यांना दाखवून द्यायचे होते की पक्ष माझाच आहे, म्हणून हा सर्व ड्रामा राष्ट्रवादीत घडला. जयंत पाटील यांची नक्कीच वाताहत झाली असती म्हणून ते रडत होते. अजूनही पडद्यामागे त्यांची वाताहत सुरू असल्याचा टोला दरेकर यांनी मारला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content