वर्षाला १५ लाख पगार, सर्व सोडून सीए तरुणी बनली साध्वी

 

अहमदाबाद : वृत्तसंस्था । मुंबईत मोठ्या कंपनीत नोकरीवर असलेल्या ३१ वर्षीय सीएने महिन्याला सव्वा लाखाचा पगाराची नोकरी सोडून सन्यास दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
.
२०१४ मध्ये पायल शाह नावाची तरुणी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील एका बड्या कंपनीत नोकरी करत होती. सीए म्हणून ती कार्यरत होती. सीएच्या परिक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये टॉप करणारी तरुणीने तिच्या आयुष्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला. अचानक तिच्या आयुष्यात बदल झाला आणि तिच्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीचा तयारी करण्यासाठी रोज तिने पाच किलोमीटर चालण्यास सुरुवात केली.

येत्या २४ फेब्रुवारीला पायल शाह तिच्या वर्तमान आयुष्याचा त्याग करणार आहे. ती तिच्या आयुष्यातील धन-ऐश्वर्य, सर्व मोहमायेचा त्याग करुन जैन साध्वी म्हणून दीक्षा घेणार आहे. नेहमी शुभ्र वस्त्र धारण करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

सुरतमध्ये होणाऱ्या एका समारंभात ती ही दीक्षा घेणार आहे आणि आयुष्यभरासाठी साध्वी बनणार आहे. तिची प्रेरणा आणि शिक्षक गुरुजी साध्वीजी प्राशमलोचनाश्रीजी यांच्याद्वारे ती या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे. पायल मूळची गुजरातची असून तिच्या वडिलांचं मुंबईत किचनवेअरचं स्टोअर आहे.

“माझा प्रवास सात वर्षांपूर्वी सुरु झाला. जेव्हा मी माझ्या घराजवळ राहणाऱ्या साध्वींच्या घरी जायला लागली. या साध्वी किती आनंदात आहेत, तेही एकही सुट्टी न घेता, मोबाईल फोनही न वापरता, मी हे पाहून आश्चर्यचकित झाली”, असं पायल शाहने तिच्या या निर्णयामागील पार्श्वभूमी सांगितली. ती त्या साध्वींसोबत राहायला लागली. “मी त्यांच्यासोबत वर्षभर तरी राहायलाच हवं, तेव्हाच माझा अंतर्गत प्रवास सुरु होईल”, असंही तिने सांगितलं.

 

Protected Content