…म्हणून ‘पानिपत’ चित्रपट पाहा – राज ठाकरे

panipat

मुंबई प्रतिनिधी । सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत असून आता ‘पानिपत’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. मऱ्हाठेशाहीच्या शौर्याचा इतिहास म्हणून चित्रपट पाहा, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट पाहण्याचं आवाहन ट्विटव्दारे केले आहे.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘पानिपत’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानिपत सिनेमाचं प्रदर्शनापूर्वीच कौतुक केले असून त्यांनी ट्विटव्दारे सांगितले की, ‘पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानी यांनीदेखील पहायला हवा.’

Protected Content