राज्यातील पाच जिल्ह्यात किटकनाशक वापरण्यास बंदी

kitakanashak


मुंबई वृत्तसंस्था । कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर, विक्री आणि वितरण करण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यात काही कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाला होता. ही कीटकनाशके अतिविषारी असून, त्यांचा बेकायदा संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री व वापर करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री यांनी दिली आहे.,

Protected Content