पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

 

बुलढाणा, प्रतिनिधी । जिल्ह्यातील शहीद जवान सतिष सुरेश पेहरे रा. अमोना पो. शेलगांव आटोळ ता. चिखली हे पुर्व लद्दाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे १४  जुलै २०२० रोजी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे आर्थिक मदतीचा  धनादेश   पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला आहे. 

शहीद सतिष सुरेश पेहरे या जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने १ कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला.  याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये ६० लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी जया सतिष पेहरे, वीरमाता  अलका सुरेश पेहरे यांना २० लक्ष रूपये, वीरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना २० लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला.

 

 

 

Protected Content