जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा ‘कोविड रुग्णालय’ घोषित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

 

जळगाव, प्रतिनिधी ।  शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आज ( दि. २० मार्च रोजी ) पुन्हा  कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले नॉन-कोविड रुग्णांना पुढील उपचारासाठी राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेले जळगाव जिल्ह्यातील इतर नॉन कोविड खाजगी रुग्णालयांमध्ये टप्प्या टप्प्याने रुग्ण स्थलांतरीत करण्यात यावेत. यासोबत अधिष्ठाता यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग हे तात्पुरत्या स्वरुपात सी-१ वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहेत.

 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे .

Protected Content