एस.टी. कर्मचा-यांना राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्या – संदीप शिंदे (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एस.टी. कर्मचा-यांना राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्या व प्रलंबित आर्थिक मागण्यांची पुर्तता तातडीने करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली. ते राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज जळगाव दौरा केला असून पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.

 

संदीप शिंदे पुढे म्हणाले की,  रा. प. कामगारांना सन २०१६-२०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहिर झालेल्या रु.४८४९ कोटीचे वाटप करताना देय होणा-या थकबाकी रक्कमेचे ४८ हप्ते हे माहे मे देय जून २०२२ च्या वेतनात संपणार आहेत. त्यानंतर कामगारांना दरमहा देय होणा-या वेतनामध्ये मोठी कपात होणार आहे. त्यामुळे घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दरांची सन २०१६ पासूनची देय होणारी थकबाकी व महागाई भत्याची सन २०१८ पासूनची देय होणारी थकबाकी अशी मिळून एकूण थकबाकी सुमारे रु. १२००/- कोटी इतकी देय होते. सदरची थकबाकी कामगारांना त्वरीत देण्यात यावी. सन २०१६-२०२० च्या एकतर्फी वेतनवाढीतील शिल्लक रक्कमेचे वाटप कामगारांच्या मूळ वेतनामध्ये होणे आवश्यक असून सदर रक्कमेचे वाटपही तातडीने करण्यात यावे. नुकतेच मूळ वेतनात जाहिर केलेले रु.५,०००/- रु.४,०००/- व रु.२,५००/- या रक्कमेमुळे अनेक जेष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. सदरच्या त्रुटी मान्य केल्याप्रमाणे दूर करण्यात याव्यात. दि. १ एप्रिल २०१६ पासून रा.प. कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह ७ वा वेतन आयोग लागू करावा. त्यासाठी संघटना १० वर्षाची मुदत मान्य करण्यास तयार आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी उदा. एकतर्फी वेतनवाढीचा फरक, रजा रोखीकरण इत्यादी प्रलंबित देणी तात्काळ अदा करावीत. तसेच कायमस्वरूपी मोफत पास देण्यात यावा. ज्या कर्मचा-यांनी कोरोनाच्या काळात कामगिरी केलेल्या आहेत अशा कर्मचा-यांना कोरोनाचा भत्ता मिळालेला नाही तो त्वरीत देण्यात यावा, वाहकांना ईटीआयएम मशिन नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांना तिकिट देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तरी चांगल्या प्रतीच्या ॲडॉईड ईटीआयएम मशिन देण्यात याव्यात, स्पेअर पार्टस्, टायर्स, बॅटरी यांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा. वरील मागण्यांबाबत संघटनेशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यात यावा. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी कामगारांना संघर्ष करावा लागू नये त्यादृष्टीने उचित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1137627990136670

 

Protected Content