सुरभिचा वर्धमान दिवस उत्साहात साजरा

 

जळगाव प्रतिनिधी | शहारातील “आश्रय” मतिमंद मुलांच्या आश्रमात नुकताच “सुरभि”चा २१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे.

सुरवातीला मंडळाच्या अध्यक्षा, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांकडून केक कापुन साजरा करण्यात आला. दरवर्षी वर्धापनदिन वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेत वर्धापनदिन साजरा करीत असतात.

“आश्रय” मधील 20 मुलांना नित्यउपयोगी वस्तू, खाऊ, डाळ, तांदूळ, चहा, साखर, ड्रायफ्रूट, तेल, डिटर्जंट पावडर व केक, नॅपकिन वाटण्यात आले.अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी व्यवस्थापिका रेखा पाटील ह्यांचा नॅपकीन श्रीफळ देऊन सन्मान केला, रेखा पाटील ह्यांनी आश्रयची सर्व मुलांची व तेथील सर्व व्यवस्था कशी ठेवली जाते ह्याची माहिती तसेच अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी सुरभि मंडळाच्या कार्या विषयी सांगितले. ह्यावेळी, मातोश्री वृद्धाश्रमात सुध्दा खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी संजय काळे ह्यांनी मातोश्रीची सर्व माहिती सांगितली. ह्यावेळी उपाध्यक्षा रेवती शेंदुर्णीकर, सचिव मंजुषा राव, सविता नाईक, वैशाली कुळकर्णी, संजीवनी नांदेडकर, मेघा नाईक, अश्विनी जोशी, माधुरीताई फडके उपस्थित होत्या.

भारती लाड, छाया करकरे, प्राजक्ता पारंगावकर, प्रज्ञा जोशी, सरोजताई वाडकर, निलीमा नाईक, वृषाली दलाल, चैताली मोरदे, वैशाली ढेपे, तनुजा पाठक, पूनम जोशी, शिल्पा नाईक, अंजली पाटील, अविता जोशी, विनया भावे, रागिणी तांबोळी, प्रियंका जोशी, आशाताई कानेटकर, आर्या शेंदुर्णीकर यांनी आर्थिक सहकार्य केले.

Protected Content