महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करा : राज्य शासनाचे आवाहन

मुंबई वृत्तसंस्था । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करू नये असे आवाहन राज्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दि.6 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ६६ वी पुण्यतिथी आहे. हा दिवस देशभरात महापरिनिर्माण दिन म्हणून साजरा केला जात असून या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या ठिकाणी सभा, संमेलने, मोर्चा याशिवाय कुठलाही कार्यक्रम घेऊ नये असे राज्य शासनाने जाहीर केले असून या वर्षीचा महापरिनिर्माण दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या असून यानुसार शिवाजी पार्क व दादर येथील चैत्यभूमी परिसरात कोणतेही स्टॉल लावण्यात येणार नाही असे जाहीर करत अनुयायांनी घरूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महापरिनिर्वाण दिन साजरा करावा असेही आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content