धनादेश अनादरप्रकरणी एकाला अटक

shanipeth crime news

जळगाव प्रतिनिधी । धनादेश अनादर प्रकरणात पोलीसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला शनीपेठ पोलीसांनी अटक केली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

याबाबत महिती अशी की, शनीपेठ हद्दीतील गोपाळपूरा येथे राहणार आरोपी जितेंद्र अनिल सोनार (वय-35) याने समोरील व्यक्तीला दिलेला चेक बाऊंस झाल्याने त्यांच्याविरोधात कलम 138 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाने दिलेल्या तारखेस हजर राहत नसल्याने अखेर त्याच्या विरोधात पकड वारंट जारी करण्यात आले होते. आज सकाळी 8 वाजता आरोपीच्या राहत्या घरातून शनीपेठ पोलीसांनी अटक करत पुढील कारवाई करण्यात आली. पोहेकॉ अशोक पवार, पोना प्रशांत देशमुख आणि पोना रविंद्र भारंबे यांनी ही कारवाई केली.

Protected Content