जळगाव शहरात सोमवारपासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेतर्फे सोमवारपासून प्रभाग निहाय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.  शहरातील नागरीकांना कोविड-१९ करीता ६ झोनमध्ये स्वयंस्फुर्तीने बंद (जनता कर्फ्यू ) पाळावयाचे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

निवडणूक प्रभागामधील सर्व नागरिक, व्यावसायिक तसेच सर्व खाजगी आस्थापना यांनी त्या त्या दिवशी स्वयंस्फुर्तीने बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. जनता कर्फ़्युसाठी शहराचे सहा विभागांत विभागणी करण्यात आली आहे. यात प्रभागनिहाय जनता कर्फ्यू पुढील प्रमाणे असणार आहे.

खालील भागात पाळला जाईल जनता कर्फ्यू

सोमवार (२० जुलै) : प्रभाग १, २, ३- शिवाजीनगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर, इंद्रप्रस्थ नगर, गेंदालाल मिल, वाल्मीकनगर असोदा रोड, कांचननगर, सदाशिव नगर आदी परिसर.

मंगळवार (२१ जुलै) : प्रभाग ४, ५, ६- शनिपेठ, रिधूरवाडा, जोशीपेठ, ओंकारनगर, जयसिकनवाडी, तायडे गल्ली, विसनजी नगर, अजिंठा चौफुली, जिल्हापेठ, ओंकारनगर, नशिराबाद रोड, कालिकामाता मंदिर परिसर नगर.

बुधवार (२२ जुलै) : प्रभाग ७, ८, ९- यशवंत कॉलनी, रिंगरोड, शिक्षकवाडी, एलआयसी कॉलनी, शिवकॉलनी, जिवरामनगर, भोईटेनगर, दादावाडी, शंकरअप्पा नगर, हायवेदर्शन कॉलनी, पिंप्राळा आदी परिसर.

गुरुवार (२३ जुलै) : प्रभाग १०, ११, १२- दांडेकरनगर, पिंप्राळा, ख्वाजानगर, हुडको, हरिविठ्ठलनगर, बाजारपट्टा, कोल्हेनगर, महाबळ परिसर, मकरंद कॉलनी, पार्वतीनगर, रामानंद नगर, प्रभाग कॉलनी, जयनगर आदी.

शुक्रवार (२४ जुलै) : प्रभाग १३, १४, १५- मोहनगर, आदर्शनगर, नेहरू नगर, मोहाडी रोड, लक्ष्मीनगर मेहरूण, आदर्श नगर, मोहमद्दियानगर, जोशी वाडा, ज्ञानेश्‍वर चौक आदी.

शनिवार (२५ जुलै) : प्रभाग १६, १७- सिंधी कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, गणेश नगर, अशोक नगर, औदोगीक नगर आदी

रविवार (२६ जुलै) : प्रभाग १८, १९- अक्सानगर, गणेशपूरी, रामेश्‍वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी आदी परिसर.

या जनता कर्फ्यू मधुन सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा, दवाखाने, क्लिनीक, सर्व औषधी दुकाने, सर्व तपासणी लॅब्स, शासकिय कार्यालये तसेच बँका यांना वगळण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सोमवार दि. २० जुलै पासुन त्यांच्या प्रभागासाठी दिलेल्या कालावधीत स्वयंस्फुतीने बंद पाळून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

Protected Content