स्मशानभूमित अतिक्रमण, वृद्धेचा मृतदेह पालिकेसमोर पडून

बुलढाणा वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाच्या संसर्गाने अनेकांचा बळी पडला आहे.  अशातच बुलढाणा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेसमोर वृद्धेचं प्रेत पडून आहे. स्मशानभूमित अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जागाच नसल्यानं वृद्धेचा मृतदेह पालिकेसमोर ठेवला आहे. 

बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा शहरातील कोष्टी समाजातील एका वृद्ध महिलेचे प्रेत अंत्यविधीला स्मशानभूमित जागा नसल्यामुळे समाजबांधवांनी देऊळगावराजा नगरपालिकेमध्ये आणून ठेवले. तब्बल 3 तासाच्या आंदोलनंतर मुख्याधिकाऱ्यानी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतलं. देऊळगांव राजा शहरातल्या सत्यभामा येलगिरे या 82 वर्षीय वृद्ध महिलेचा काल वृद्धापकाळाने मृत्यू झाला. मात्र, कोष्टी समाजा असलेल्या स्मशानमभूमीत अतिक्रमण वाढल्याने अंत्यसंकर करण्यासाठी जागा नसल्याचं सांगण्यात आलं.

यापूर्वी अतिक्रमण काढावं म्हणून अनेकवेळा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे कोष्टी समाजातील लोकांनी काल या वृद्ध महिलेचा मृतदेहच नगरपालिकेसमोर आणून ठेवला. यावेळी मुख्याधिकारी यांना जाब विचारत तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केलं गेलं. शेवटी मुख्याधिकारी यांच्या अतिक्रमण काढण्याच्या आश्वासनंतर त्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content