शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात; मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी  देण्यात आली आहे.  15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच  अध्यादेश काढणार आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने खासगी शाळांनी फीमध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत सरकारकडून मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अध्यादेश काढला  जाईल.  खासगी शाळांचीफी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.  

मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शाळा बंद असताना सुद्धा शाळांनी फी वाढवल्याचा तर काही शाळांनी फी वसुली करण्याबाबतच्या तक्रारी पालकांकडून  सातत्याने पुढे येत होत्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

Protected Content