शेगाव ते गौलखेड रस्ताच्या कामाला मुहूर्त मिळेना ! (व्हिडीओ)

shegav

खामगाव अमोल सराफ । येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शेगाव ते गौलखेड मार्गवरील रस्त्याचे भुमिपुजन 28 जुन 2018 रोजी करण्यात आले होते. हा रस्ता एका वर्षात पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची जवाबदारी काशीलानी कार्पोरेशन यांना मिळाली होती. मात्र अद्याप ही रस्ताचे काम पुर्ण झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, याची लांबी जवळ जवळ साडेचार किलोमीटर असून अंदाजीत किंमत 160.61 लक्ष रुपये आहे. या निविदा 27 जुन 19 या तारखेपासून पुढील पाच वर्षापर्यंत या रस्त्यांच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी काशीलानी कन्स्ट्रक्शन वर होती. तसेच 27 जुन 2024 पर्यंत हा रस्ता जर कोणत्याही कारणामुळे खराब झाल्यास तर त्याला काशीलानी कन्स्ट्रक्शन कंपऩी कोणताही मोबदला न घेता दुरुस्त करून देईल अशी ही निविदा देण्यात आली होती.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 ते खेर्डा ग्राम तालुका शेगाव असा हा रस्ता असून या रस्त्यामध्ये एक मोठा पूल सुद्धा आहे. रस्ता खोदून या रस्त्यामध्ये गिट्टी, मुरूम तसेच काय लागणार असल्याचा सर्व काही लिखाणमध्ये इथल्या बोर्डावर काशीलानी कन्स्ट्रक्शनने नामांकित करून ठेवलं आहे.

नागरिकांना मधून प्रश्न उपस्थितीत होत आहे.

मात्र एक वर्ष झाले असून सुद्धा कामाला सुरुवात झालेली नाही आहे. या रस्त्यावर भरपूर वर्दळ असून समोर जे गौलखेड गाव आहे, तेथून शाळेचे विद्यार्थी सायकलवर व ऑटोने ये-जा करतात, रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेले आहेत, पण तिकडे कोणाचा प्राण जावो काही दुर्घटना घडो ठेकेदाराला काही घेणे-देणे नाही. त्याला जो नफा मिळणार आहे तो नफा मिळणारच, जर का एका वर्षानंतर सुद्धा रस्त्याचे काम सुरू होत नाही तर ठेकेदार व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा या भ्रष्टाचारामध्ये हे सामील झाले आहेत. आज रोजी रस्त्याच्या कडेला फक्त गिट्टी आणि काही जागेवर मुरमाचे ढीग लागलेले दिसता आहेत. खरंतर हे ढीग एक वर्ष अगोदर म्हणजेच दिनांक 28 जुन 2018 रोजी पळायला पाहिजे होते. परंतु आज 15 जुलै 2019 तारिख लोटली असून सुद्धा या रस्त्यावर अजूनही कामाला सुरुवात झालेली दिसून येत नाही, तर दुसरीकडे बोर्डावर काम पूर्णत्वाचा दिनांक 27 जुन 2019 हे ठळक अक्षरात लिहिलेला दिसून येतो, आणि येथूनच पुढचे 5 वर्षेपर्यंत या रस्त्याची जवाबदारी काशीलानी कन्स्ट्रक्शनची असून ते ती पूर्ण करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजेच 27 जुन 2024 पर्यंत या रस्त्यावर जर का फूट झाली तर त्याला विनाशुल्क दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. परंतु कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास ही संस्था डोळेझाक का करत आहे. हे समजेनासे झाले आहे.

त्यातच मुरूम मिश्रित सुद्धा पडलेले ठीक आहे. विशेष म्हटला म्हणजे महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय ची शाळा आणि वसतिगृह सुद्धा याच रस्त्यावर आहे, तरीसुद्धा शासनाचे अधिकारी या रस्त्याच्या कामाकडे मागील एका वर्षापासून का दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, नामदार संजय कुटे सलग मागील १५ वर्षा पासुन जळगाव जामोद मतदार संघातुन निवडुन आलेले आहेत. तरी सुध्दा जर मतदार संघात सरळ भ्रष्टाचार ते रोखण्यात असर्मथता दाखवत असतील तर या देशाच्या भ्रष्टाचार कधीच संपु शकत नाही, असा संपात नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Protected Content