सावखेडा सिम ग्रामपंचायत सरपंचपदी हजराबाई तडवी यांचा विजयी

bdd6bc29 17d5 452d 962c 6ac5889bbe7e

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या सरपंचपदी हजराबाई सरदार तडवी यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी सुभेदार चाँदखा तडवी यांचा ५ विरुद्ध ४ असा पराभव केला.

 

य संदर्भात अधिक असे की, सावखेडा सिम तालुका या ग्राम पंचायतच्या विद्यमान सरपंच साकीर मुबारक तडवी यांनी दिनांक ६ जून रोजी रोजी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्याकडे सादर केला होता. साकीर तडवी यांचा राजीनामा मंजुर झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आज दिनांक १९ जुलै रोजी सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी किनगाव विभागाचे मंडळ अधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी सचिन जगताप आणि बामणोदचे मंडळ अधिकारी बी.एम.पवार यांच्या प्रमुख उपस्थित विशेष सभा घेण्यात आली. या सभेला एकुण ९ ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच चेतन सुधाकर पाटील, साकीर मुबारक तडवी, सकीना दगेखॉ तडवी, जयश्री दिनेश पाटील, देविदास गोविंदा पाटील, सुभेदार चाँदखॉ तडवी, नसिबा नुरमोहम्मद तडवी, शबनम सलीम तडवी, हाजराबाई सरदार तडवी असे सर्व सदस्य उपास्थित होते. यावेळी सरपंचपदा करीता हाजराबाई सरदार तडवी व सुबेदार चाँदखॉ तडवी  यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जगताप यांच्याकडे दाखल केले होते.

 

यावेळी निवडणुकीत  हाजराबाई सरदार तडवी यांनी ४ विरुद्ध ५ मतांनी निवडुन येत सुभेदार तडवी यांचा पराभव केला. दरम्यान तडवी यांनी सरपंच निवडीसाठी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतू सदस्य साकीर मुबारक तडवी यांनी यावर हरकत घेत, हातवर करून मतदान करावे अशी मागणी केली. यावर निवडुक निर्णय अधिकारी सचिन जगताप यांनी कायद्यानुसार मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या मतदानात ४ विरुद्ध ५ मते घेऊन हाजराबाई सरदार तडवी या निवडुन आल्यात. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सचिन जगताप यांनी काम पाहीले. त्यांना बामणोद मंडळ अधिकारी बी. एम.पवार, सावखेडा सिमचे ग्रामसेवक मकरंद सुधाकर सैंदाणे, दहिगावचे तलाठी विलास नागरे, लिपीक गणेश रामचंद्र पाटील, संगणक परिचारक सिकंदर तडवी यांनी सहकार्य केले.

Protected Content