खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात उद्या हल्लाबोल आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या जाचक धोरण व महागाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा  हल्लाबोल मोर्चा पक्ष कार्यालयपासून प्रारंभ होवून जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप करण्यात येणार आहे. यात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते अरुणभाई गुजराती, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी जिल्हाध्यक्ष सतिशआण्णा पाटील, आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात माहंगाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात उद्या मोर्चा व आंदोलन करण्यात येणार आहे.

तरी महागाईची झळ सोसणारी आम जनता तसेच आमदार, माजी खासदार , माजी आमदार , माजी जि .प., प.स. सदस्य , नगरसेवक , माजी नगरसेवक , जिल्ह्यातील व महानगरातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते सर्व फ्रंटल यांनी उद्या मंगळवार दि. १७ मे रोजी सकाळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय आकाशवाणी चौक या ठिकाणी वेळेवर उपास्तिथ रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: