Home अर्थ पंतप्रधानांनी एक हेडलाइन आणि एक कोरा कागद दिला ; मोदींच्या आर्थिक पॅकेजवर...

पंतप्रधानांनी एक हेडलाइन आणि एक कोरा कागद दिला ; मोदींच्या आर्थिक पॅकेजवर कॉंग्रेसची टीका


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काल पंतप्रधानांनी आम्हाला एक मथळा आणि कोरा कागद दिला. साहजिकच माझी प्रतिक्रिया देखील कोरी होती. आज आम्ही अर्थमंत्र्यांकडून भरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदावर नजर ठेवून असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर काँग्रेसने टीका केली आहे.

 

पी. चिदंबरम यांनी बुधवारी एक ट्विट करत सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, हा निर्णय उशिरा झाला आहे. काल पंतप्रधानांनी एक हेडलाइन आणि एक कोरा कागद दिला, जो आज अर्थमंत्री भरणार आहेत. आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवणार आहे. कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू. गरीब, भुकेलेले आणि उद्ध्वस्त झालेल्या परप्रांतीय कामगारांना शेकडो किलोमीटर चालून आपल्या घरी पोहोचल्यावर काय मिळणार आहे ते आम्ही पाहणार,असेही चिदंबरम म्हणाले.


Protected Content

Play sound