जळगावात मोबाईलचा स्फोट; सुदैवाने हानी टळली

mobile burst

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एसएमआयटी कॉलेजच्या मागे एका घरात मोबाईलचा जोरदार स्फोट झाल्याची घटना दुपारी घडली.

याबाबत वृत्त असे की, शहरातील एसएमआयटी कॉलेजच्या मागे वास्तव्यास असणार्‍या शरद पंढरीनाथ पाटील यांच्याकडे झोलो कंपनीचा मोबाईल आहे. आज दुपारी हा मोबाईल दिवाणखान्यात ठेवून ते वामकुक्षी घेत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक मोठा आवाज झाला. त्यांनी तातडीने दिवाणखान्यात धाव घेतली असता मोबाईलचा स्फोट होऊ धुर निघत आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटील यांनी लागलीच आग विझवली असता त्यांना बॅटरीचा स्फोट झाल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे हा स्मार्टफोन जास्त चार्ज झालेला नव्हता. तसेच त्याला चार्जींगलाही लावलेले नव्हते. असे असतांनाही स्फोट झाल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. सुदैवाने यात हानी झाली नाही. तथापि, स्मार्टफोनच्या सुरक्षित वापराचा मुद्दा हा यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

Protected Content