पवार मुख्यमंत्री असते तर !

मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर.. राज्याचे चित्र वेगळे दिसले असते, असे महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील कार्यक्रमात केले. पवार यांच्या नेतृतावाबाब्त शंकाच नाही त्यांना युपीएचे अध्यक्षपद दिले गेले तर संपूर्ण भारत देशाला  याचा फायदाच होईल, असे खोचक उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी  दिले, यावरून महाविकास आघाडीतील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नियोजित कार्यक्रमासाठी विदर्भ दौऱ्यावर होते. अमरावती येथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृहाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचे चित्र अजून वेगळे असते, असे मनोगत व्यक्त केले. यावर यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, आज नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाही. मला तर वाटतं त्यांना युपीएचे अध्यक्षपद दिले गेले तर संपूर्ण भारत देशाला याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया देत, यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का?” असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओ प्रतिक्रियेतून यशोमती ठाकूर यांना विचारला आहे.

Protected Content