धरणगावात पाच दिवसीय निष्ठा प्रशिक्षण

 

धरणगाव प्रतिनिधी । येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये पाच दिवसीय निष्ठा प्रशिक्षण म्हणजेच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी राष्ट्रीय पुढाकार) प्रशिक्षणाचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांच्याहस्ते उद्घाटन करून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.

प्रशिक्षण वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगावचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी भेट दिली. त्यावेळेस त्यांच्या उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी व प्रशिक्षणार्थींनी नवीन वर्षप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करेन, तसेच माझा समाज व माझा देश बलवान होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अशाप्रकारे संकल्प प्रतिज्ञा घेतली. निष्ठा प्रशिक्षण हे देशव्यापी प्रशिक्षण असून ते शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचे असून शिक्षक हा शैक्षणिक नेता आहे. असे मत डॉ. राजेंद्र महाजन मांडले.

यांचे मिळाले मार्गदर्शन
प्रशिक्षण वर्गात कला एकात्मिक अध्ययन शाळा आधारित मूल्यांकन शाळेमधील आरोग्य व स्वास्थ, गणित, भाषा, अध्यापन, शास्त्र शालेय शिक्षणातील पुढाकार अध्ययन निष्पत्ती आणि सर्वसमावेशक शिक्षण माहिती संप्रेषण अध्ययन इत्यादी विषयांचे अध्यापन तज्ञ मार्गदर्शक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगावचे विशेष सहाय्यक किशोर पाटील तसेच तालुक्यातील निष्ठा प्रशिक्षण लोणावळा येथून घेतलेले तज्ञ शिक्षक डी.एन.पाटील, हेमंत पाटील, महेंद्र पाटील, जयवंत खैरनार व रामकृष्ण बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण तीन टप्पात
प्रशिक्षण वर्गास तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अनिल बाविस्कर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण वर्गास तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक सकाळी 10 ते 5 या वेळेत प्रशिक्षण घेत आहेत. सदर प्रशिक्षण तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख जि.प.शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना देण्यात येत असून या प्रशिक्षणाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत.

प्रशिक्षणास विशेष सहकार्य
प्रशिक्षणाचा पहिला टप्प्यास् दि.30 डिसेंबरपासून सुरू झाली असून दि.3 जानेवारी 2020 पर्यंत असे पाच दिवसांचे प्रशिक्षण असणार आहे. यासाठी महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम व शिक्षक वृंद तसेच केंद्र प्रमुख साधन व्यक्ती सामावेश शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Protected Content