सरदार पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूल मध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व शिक्षकांच्या वतीने मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उपस्थिती दरम्यान शाळेचे चेअरमन शशिकांत फेगडे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे व प्रशांत फेगडे इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून शशिकांत फेगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे यांनी शशिकांत फेगडे यांचे शाळेच्या वतीने स्वागत सत्कार केले . शशिकांत फेगडे यांच्या हस्ते इयत्ता नर्सरीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले तसेच वर्गामध्ये त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान शशिकांत फेगडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर असे भाषण करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .अशा प्रकारे आजचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला. शाळेच्या परिसरात आयोजीत कार्यक्रमात सर्व प्रथम शाळेच्या ईमारतीची व वर्गाची सुन्दर अशी सजावट करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या उपस्थिती साठी पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.अर्चना चौधरी यांनी केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content