किनगाव परिसरात भुरट्या चोरटयांचा धुमाकुळ : रात्रीची गस्त वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी

यावल,  प्रतिनिधी | कोरोना महामारीचे संकट असतांना किनगाव परिसरात भुरट्या चोरांनी शेतातून शेती अवजारे चोरीचे सत्र सुरु केल्याने पोलीसानी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

शेतकऱ्यांच्या  शेतातून ८ दिवसात दोन वेळा विजपंपाच्या केबल वायरींची चोरीचा प्रकार घडला आहे. संकटात असणाऱ्या  शेतकऱ्यांची परीस्थीती काय होईल असाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.  किनगाव येथील शेतकरी संदीप चुडामण पाटील, सिताराम महाजन, चंदू टेलर व किनगांव बुद्रूक ग्रा.प.मालकीचे मोटकरे शेत यांची शेती अवजारे चोरीस गेली आहेत.  संदीप पाटील यांचे गट नं.१३ सह सिताराम महाजन,चंदू टेलर व ग्रा.प.चे मोटकरे शेत यांचे चुंचाळे रस्त्यावर शेत आहेत. गेल्या आठवड्यात यांच्या शेतातून अंदाजीत २० हजार रूपये किंमतीची विजपंपाची केबलवायरी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मात्र बागायत शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने वरील सर्व शेतकऱ्यांनी विज पंप सुरू करण्यासाठी नवीन २० हजार रूपयांच्या वायरी आणल्या व त्या लावून पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली. मात्र दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुंन्हा या केबल वायरी चोरून नेल्या आधीच शेतीत पुरेसे उत्पंन्न येईल की नाही याची खात्री नसतांना आठ दिवसात जर दोनवेळा केबल वायरींची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्या शिवाय राहणार नाही. किनगावसह परीसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असुन चोरांना पोलिसांचा धाक वाटत नाही की काय?असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकरी दिवसरात्र शेतीत मेहनत करून एक एक रूपया जमा करतो आणि चोर मात्र हजारो रूपयांच्या शेतीपंपाच्या केबल वायरी चोरून नेतात म्हणून किनगावसह परीसरातील या भुरट्या चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त राबवावी अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.

 

Protected Content