शिवाजी नगरातील सॉमिलमध्ये ईलेक्ट्रिक सामानांची चोरी; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर आणि कानळदा रोडवरील एका सॉमिलमध्ये अज्ञात चोरट्यांनी  ५० ते ६० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज शनिवारी उघडकीला आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सुधीर नटरवरलाल शहा (वय-५६) रा. नागेश्वर कॉलनी, महाबळ यांचे शिवाजी नगर आणि कनळदार रोडवर श्रीनाथजी नावाचे सॉमिल आहे. त्याच ठिकाणी त्याचे ऑफिस व इलेक्ट्रिकसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री १.३० ते २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रीक ॲम्पिअर, ईलेक्ट्रिक लहान मिक्सर, वायरचे बंडल, स्पिकर आणि क्लिपचा बाँक्स असा एकुण अंदाजे ५० ते ६० हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी सामानाची चोरी करण्यासाठी चारचाकी वाहनात मुद्देमाल चोरून नेल्याचे परीसरातील  नागरीकांनी पाहिले. याप्रकरणी सुधीर शहा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content