बिल्दी पुलावर आयशरला आणि मारुती इकोची समोरासमोर धडक ; सुदैवाने जीवितहानी टळली

पाचोरा, प्रतिनिधी ! तालुक्यातील बिल्डी पुलावर झालेल्या ट्रक आणि कारच्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही

पाचोरा – जळगाव महामार्गावर बिल्दी धरणावरील पुलाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास जळगावकडे जाणारी आयशर ( क्र एम. एच. ४५ ए. एफ. १११२ ) आणि मारुती इको यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली आहे. मारुती इको ( क्र एम. एच. ०१ बी. जी. ०७६७ ) मधील माहेजी ( ता. पाचोरा ) येथील रहिवासी दानिश शेख, आरिफ शेख, अल्ताफ शेख हे जखमी झाले त्यांना प्रवाषांच्या मदतीने खेडगाव येथील वाहनचालकांच्या गाडीत टाकून पाचोरा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही

Protected Content