पालिवाल समाजातील कोरोना योद्धांचा चोपड्यात सहृदय सत्कार

 

चोपडा, प्रतिनिधी । जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाच्या संकटात असंख्य कोरोना योद्धे देवदूत म्हणून कार्यरत होते. पालिवाल महाजन समाजातही अशाच कोरोना योद्धांनी आपली निस्वार्थ सेवा बजावली. अशा कोरोना योद्धांचा नुकताच चोपड्यात एका विवाह समारंभात समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चोपड्यात आयोजित एका वैवाहिक सोहळ्यात या कोरोना योद्धांचा अखिल भारतीय पालीवाल महाजन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष  दिलीपकुमार कानुनगो यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.  चोपडा पालीवाल समाजातील वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉ. विशाल राजेंद्र पालीवाल आणि डॉ. कैलास नेमीचंद पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय पालीवाल महाजन समाजातील सुमारे १००० कुटुंबीयांना कोरोनाच्या काळात आर्सेनिक अल्बम ३० च्या माध्यमातून चोख वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. 

सत्कारार्थींमध्ये डॉ. राजेंद्र रघुनाथ पालीवाल, डॉ. विशाल राजेंद्र पालिवाल, डॉ. कैलास नेमीचंद पालीवाल, अनिलकुमार द्वारकादास पालीवाल (ज्येष्ठ पत्रकार), पालीवाल पंचायतचे अध्यक्ष प्रदीप नीळकंठ पालीवाल, पालीवाल युवा मंचचे माजी अध्यक्ष राजेंद्र भालचंद्र पालीवाल यांचा समावेश होता. 

अखिल भारतीय पालीवाल महाजन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपकुमार कानुनगो यांनी सर्व कोरोना योद्धांकडून पालीवाल समाजात कोरोनाकाळात करण्यात आलेल्या तत्पर वैद्यकीय सेवेबाबत गौरवोद्गार काढले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपण केलेल्या सेवेला आमचा सलाम आहे. तसेच यापुढेही समाजात असे कार्य चालू ठेवण्यास अखिल भारतीय पालीवाल महाजन समाज सदैव आपल्यासोबत असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 

 

यावेळी पालीवाल पंचायतीचे माजी अध्यक्ष अशोक पालीवाल, अजय पालीवाल, माजी नगरसेवक चंदुलाल पालीवाल, तथा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील असंख्य पालिवाल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विशाल पालीवाल यांनी आभार मानले. सूत्रसंचालन स्वप्नील पालीवाल यांनी केले.

 

Protected Content