राम मंदिराचा प्रश्न लवकरच मार्गी – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज (व्हिडीओ)

janardan maharaj

फैजपूर प्रतिनिधी । श्रीराम मंदिर जागेबाबत गेल्या मध्यंतरीच्या कालखंडात न्यायालयाच्या नकारात्मक भूमिकेमुळे देशभरातील संत महंतांकडून नाराजीचे सुर उमटत होते. त्यासंदर्भात संपूर्ण भारतभर ‘हुंकार रॅलीचे’ आयोजन करण्यात आले. परंतू न्यायालयाने दि. 10 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराच्या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून मंदिराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे दिल्ली येथील बैठकीत उपस्थित अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले आहे.

याबाबत माहिती अशी की, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीराम मंदिराच्या विषयाला कोर्टाने आता प्राथमिकता दिली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. श्रीराम मंदिर बाबतीत जे पक्षकार आहेत, त्या सर्व पक्षकारांचे म्हणजे एकत्र घेऊन श्रीराम मंदिराच्या अस्तित्वाबाबतीत सर्व पुरावे तपासायला न्यायालय तयार आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रश्न मार्गी लागून मंदिर निर्माण कार्याला सुरुवात होईल, अशी अपेक्षा संत समितीला आहे. अशी माहिती अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार तथा फैजपूर येथील संतपंत संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी दिली. याचबरोबर, दिल्ली येथील कन्व्हेंशन हॉल जंतरमंतर येथे अखिल भारतीय संत समितीच्या ‘श्रीराम जन्मभूमी न्याय विमर्श’ संभेचे आयोजन दि. १० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या बैठकीत श्रीराम मंदिराबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले तर श्रीराम मंदिराचा प्रश्न प्रलंबित नसून, त्याचा लवकरच निकाल लागू नये, अशी भूमिका घेणा-या बाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आले.

या बैठकीत भारतातील सर्व राज्यातील संत समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व महामंत्री तसेच विश्व हिंदू परिषदेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य अविचलदासजी महाराज, संत समितीचे प्रमुख निर्देशक श्रीमंत ज्ञानदेव सिंहजी महाराज, स्वामी परमानंद महारा, विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय, दिनेशजी तसेच वरिष्ठ कायदेतज्ञ ॲड. सुब्रमण्यमस्वामी, महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती उपस्थित होते.

Protected Content