बालकाचे अपहरण करणारा आरोपीस अटक

भुसावळ प्रतिनिधी । यावल शहरातून एका तीन वर्षीय बालकाचे अपहरण झाले होते. पोलीसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास लावला असता संबंधित बालकाचे भुसावळ येथील दिपक शर्माने अपहरण केल्याचे उघड झाले असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक बग्गाराम शर्मा (रा. सिंधी कॉलनी भुसावळ) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, यावल शहरातून एका तीन वर्षाचे बालकांचे अपहरण झाले. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्या असता भुसावळ येथून आरोपीस अटक केली असून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली असून त्याने कबूल केले आहे. आरोपीस यावल पोलिस स्टेशन यांचे कडेस पुढील कायदेशीर कार्यवाही साठी ताब्यात घेण्यात आले असून आरोपीविरोधात यावल पो. स्टे. भाग 5 गु, र न 48/2021 भा. द. वि.कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यवाही पथक:-
स. फो. अशोक महाजन, स,फो, शरीफ काझी, पो ना. युनूस शेख, पोना.किशोर राठोड, पो का . विनोद पाटील आणि पो का. रणजीत जाधव यांनी कार्यवाही केली आहे.

Protected Content