प्रा. जिजाबाई काटे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार

अमळनेर प्रतिनिधी । रुख्मिणिताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या प्रा. जिजाबाई काटे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

प्रा.जिजाबाई ज्ञानदेव काटे यांनी इतिहास विभागात गेली २० वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांना सेवापूर्ती कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.श्याम पवार हे होते .यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ. हुकूमचंद जाधव, प्रा.डॉ. मंजुश्री खरोले, प्रा.सौ.इंद्रायणी मोरे, प्रा.जयश्री साळुंके, प्रा.सौ.चारुशीला ठाकरे, प्रा.डॉ. अमोल दंडवते, प्रा.सुनिल वाघमारे, प्रा. डॉ. देवकीनंदन महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सत्कारमूर्ती प्रा.सौ.जिजाबाई काटे यांनी विद्यार्थीनीना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले .शिक्षण आणि नोकरी इतके संकुचित राहू नका. शिक्षणाचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी करावा .तसेच घरात पुस्तके भरपूर असावीत, असे त्यांनी सांगितले. अतिशय कठीण प्रसंगातही माणसाने कसे सामर्थ्याने पुढे जावे तसेच सतत कार्यमग्न रहा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांना काटे मॅडम विषयी बोलतांना भारावून आले. त्यावेळी विद्यार्थीनी कु. क्रांती ठाकरे,कु.कविता सुर्यवंशी,कु.प्रियंका, कु.चेतना यांनी आपले मनोगत व्यक्त केले

सूत्रसंचालन प्रा.सुनिल वाघमारे यांनी केले तर आभार प्रा.जयश्री साळुंके यांनी मानले .यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकेतर कर्मचारी विजय इंगळे, बी.एस.पाटील, श्री.लक्ष्मण बोरसे, दिलीप गोलाईत, रमेश चव्हाण, सौ.आशाबाई पाटील, सौ.सारिताबाई बोरसे हे उपस्थित होते.

Add Comment

Protected Content