मी बिन बजेटच्या खात्याचा मंत्री ! – ना. गुलाबराव पाटील ( व्हिडीओ )

अमळनेर प्रतिनिधी । आपण बिनबजेटच्या खात्याचा मंत्री असल्यामुळे पाडळसरे धरणाला निधी देऊ शकत नसलो तरी या आंदोलनास आपला पाठींबा असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

पाडळसरे संघर्ष समितीच्या आंदोलनास ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. याप्रसंगी आपल्या मनोगतातून ना. पाटील यांंनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केले. ते म्हणाले की, सरकार मध्ये मंत्री असलो तरी एक शेतकरी म्हणून मी पाडळसे धरणाच्या जनआंदोलनात सहभागी आहे.अमळनेर, धरणगाव सह परिसरातील शेतकर्‍यांना समृद्धी देणारे धरण खास बाब म्हणून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे! दरम्यान, आपण मंत्री असलो तरी आपणास देण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. आपण बिन बजेटच्या खात्याचे मंत्री असल्याचे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली.

दरम्यान, आंदोलन स्थळी काँग्रेस पक्ष,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह एव्हरग्रीन जेष्ठ नागरिक संघ,महाराष्ट्र राज्य असोसिएशन ऑफ लॅबोरेटरी अँनलिस्टस अमळनेर, अमळनेर शहर इलेक्ट्रिक व प्लंबर असोसिएशन, जवखेडा वि.का.सोसायटी, अमळनेर वितरक संघ,लोंढावे ग्रामस्थ,अमळनेर तालुका गतसचिव संघटना, अमळनेर ,महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, अमळनेर संभाजी ब्रिगेड, सिनिअर सिटीझन क्लब,ज्ञानेश्‍वर पाठशाळा,शुक्ल यजुर्वेदीय ब्रह्मन् संस्था,ऋग्वेदी सहायक संस्था, पुरोहित सेवा संघ,ब्राह्मण युवा मंच,ब्राह्मण महिला मंच,ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने प्रा.डॉ.प्रभाकर जोशी, सोमनाथ ब्रह्मे, चंद्रकांत कुलकर्णी, राजेंद्र खाडिलकर, संजय एकतारे,सुहास बोरकर, सुनिल मांडे, उमाकांत नाईक, प्रसाद जोशी,अरविंद काळे,सौ.शोभा देशपांडे, अरविंद जोशी,डॉ.शोभा देशपांडे, डॉ.अपर्णा मूठ्ठे, प्रा.डॉ.पी.व्ही.भावे, डॉ.सुहास देशमाने, यांचेसह समाज बांधवानी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला.

पहा – ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते !

Add Comment

Protected Content