Home आरोग्य धरणगाव तालुक्यात आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण

धरणगाव तालुक्यात आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण

0
276

धरणगाव प्रतिनिधी । कोवीड केअर सेंटरला नुकताच संशयित कोरोना रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात दोन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून एक तालुक्यातील धानोरा तर दुसरा शहरातील लोहार गल्लीतील आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा आता वाढायला लागला आहे. कालपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा १७ पर्यंत पोहचला होता. आज नव्याने दोन रूग्ण पॉझिटीव्ह आल्याने एकुण संख्या १९ वर पोहचली आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये तालुक्यातील धानोरा येथील पुरूष तर धरणगाव शहरातील लोहार गल्लीतील महिला कोरोना बाधित आढळलेत. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संबंधीत व्यक्तीचा रहिवासी असणार्‍या परिसरात फवारणी करण्यात आली असून हा परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


Protected Content

Play sound