महात्मा फुले हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

mahatma phule school

धरणगांव प्रतिनिधी । येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये ऐतिहासिकदिनी गरीब, गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना आज (दि. 3 जुलै) रोजी वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ३ जुलै, १८५१ रोजी राष्ट्रपिता, क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करुन शैक्षणिक क्रांतीला सुरूवात केली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधुन शाळेतील शिक्षिका एम.जे. महाजन यांचे वडील जगन्नाथ महाजन यांच्याकडुन गरीब, गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.टी. माळी यांनी प्रास्ताविक केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षका पी.आर.सोनवणे मॅम होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही.टी. माळी तर एस.व्ही.आढावे यांनी आभार मानले.

Protected Content