पूजा मुळे यूपीएससीत देशातून ११ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

0

कोल्हापूर प्रतिनिधी । येथील पूजा ज्ञानेश्‍वर मुळे यांनी युपीएससीमध्ये देशातून अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे.

कोल्हापूर येथील सर्जनशील लेखक व विदेश विभागातील सेवानिवृत्त सचिव ज्ञानेश्‍वर मुळे तसेच दिल्ली येथील आयकर आयुक्त साधना शंकर यांची सुकन्या पूजा ज्ञानेश्‍वर मुळे हीने यूपीएससीत भारतात ११ वी रँक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. पूजा मुळे यांनी पर्सनल अडमिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. पूजा मुळे यांच्या यशा मुळे मुळे सरांच्या मूळ गावी अब्दुललाट व कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे.

पूजा मुळे या अवघ्या २६ वर्षांच्या असून आजच त्यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांनी वाढदिवसालाच देदीप्यमान यश संपादन केले आहे. तर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी प्रशासकीय सेवेत केलेला प्रवेशदेखील कौतुकाचा विषय बनला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.