पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील महावीर पब्लिक स्कूल मध्ये स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात घेण्यात आले.
या स्नेहसंमेलनाचे उदघाटन पहुर पोलिस स्टेशनचे एपीआय दिलीप शिरसाठ यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी किरण बरगे, पहूर पेठच्या प्रथम लोकानियुक्त सरपंच नीताताई रामेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य सौ पूजाताई भडांगे, उपसरपंच योगेश भडांगे संस्थेचे चेअरमन व माजी जि.प.कृषी सभापती श्री प्रदीप भाऊ लोढा, जैन इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मनोज कावडिया, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, विकासो चेअरमन भिका पाटील कृषी पंडित पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव पाटील, महात्मा फुले पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक जाधव, माजी चेअरमन जिनिंग प्रेसिंग शाम सावळे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी, शरद भागवत पांढरे, शैलेश पाटील, ज्ञानदेव करवंदे, योगेश बनकर, पंकज लोढा, व्हाईस चेअरमन माहाविर पब्लिक स्कूल, तुळशीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात विविध विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटीकेतुन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांना भारावून टाकले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी त्यांना रोख पारितोषिके दिली. या कार्यक्रमाच पहूर येथील प्रथम सी. ए. होण्याचा मान मिळविणारी भावना संजय रुणवाल हिचा सत्कार सौ. उज्वला लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस.आर. कुलकर्णी ,कंडारे मॅडम, चव्हाण सर, दीपाली नेमाडे, दिपाली पाटील, सुनिता तायडे, जयश्री खाटीक ,कविता लाड म सुषमा लोहार,मीनाक्षी महाजन, सोनल, अर्चना थोरात, वर्षा वेदकर अशीफ पिंजारी, किरण भट ,वेदन पाटील ,व सर्व ड्रायव्हर बंधू यांनी परिश्रम घेतले.