पुतण्याकडून काकाची ६ लाखात फसवणूक; धरणगाव पोलीसात गुन्हा

धरणगाव प्रतिनिधी । ६ लाख रूपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची खोटी बतावणी देवून काकाची फसवणूक करणाऱ्या पुतण्याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बांभोरी येथील भगवान हरी पाटील (वय-४२) रा. बांभोरी बु ॥ ता. धरणगाव हे शेती काम करतात. त्यांच्या भावाचा मुलगा भरत छगन पाटील याला धरणगाव येथील जेडीसीसी बँकेतून ५ लाख ९८ हजार रूपये काढून एन.बी.कॉटेक्समध्ये देण्याची जाबाबदरी दिली होती. ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भरत छगन पाटील याने काका भगवान पाटील यांना फोनद्वारे सांगितले की, काही अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येवून माझ्या हातातील पैसे हिसकावून पळ काढल्याची खोटी माहिती. आपली फसवणूक झाली असल्याची खात्री होता. भगवान पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात पुतण्या भरत पाटील यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. विलास सोनवणे करीत आहे.

Protected Content