Home क्राईम मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ; २९ चोरीच्या मोटारसायकलींसह चार आरोपी जेरबंद 

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ; २९ चोरीच्या मोटारसायकलींसह चार आरोपी जेरबंद 

0
11


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २९ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून जप्त वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपींकडून चोरीच्या २९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. चोरी केलेली वाहने विक्री करण्यासाठी आरोपी रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरात उभी करून ठेवत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या माध्यमातून ते चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात गुजरात राज्यातील उधना (सुरत), तसेच ठाणे, नवी मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, रायगड आदी जिल्ह्यांमधील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मुक्ताईनगर पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशीष आडसूळ आणि त्यांच्या पथकाने केली


Protected Content

Play sound