राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धेत मु.जे. महाविद्यालयाचा संघ द्वितीय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । करिअर कौसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज (स्वायत्त), अमळनेर व लायन्स क्लब, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा ५ व ६ सप्टेंबर २०२३ रोजी प्रताप महाविद्यालयात संपन्न झाल्या.

सदर स्पर्धेत राज्यभरातून वीस महाविद्यालयातून सहभाग नोंदविला गेला . यात मु.जे .महाविद्यालयात शिकणाऱ्या राज्यशास्त्र एस.वाय.बी.ए. चा विद्यार्थी प्रतीक भारत वरयानी व सूक्ष्मजीवशास्त्रे विभागातील अथर्व मुंडले यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. या विद्यार्थांसोबत संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.लोकेश तायडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्तपूर्वी या स्पर्धकांना कॅरियर कट्टा या मु.जे.महाविद्यालयाच्या उपक्रमामार्फत घेण्यात आलेल्या स्क्रीनिंग टेस्ट फॉर क्विझ्व कॉम्पेटीशन या स्पर्धेत सर्वाधिक गुण  मिळाल्याने त्यांची निवड करण्यात आली .करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा.राजीव पवार यांच्या मार्गदर्शनात ही निवड चाचणी घेण्यात आली.  विद्यार्थांचे महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे. यांनी कौतुक केले.

Protected Content