तरुणावर लोखंडी ब्लेडने जीवघेणा हल्ला

जळगाव, प्रतिनिधी । मावस बहिणीला रागावुन घराकडे निघालेल्या तरुणावर तीन अनोळखी हल्लेखोरांनी लोखंडी ब्लेडने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, योगेश अनील पवार (वय-२२) हा शहरातील सत्यम पार्क दुधफेडरेशन जवळ कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. येागश ची मावशी जुने जळगाव डॉ. आंबेडकर नगरात राहते, आज सकाळी तो मावशी कडे गेला असतांना तेथे मावशी तीच्या मुलीवर रागवत होती. बोलण्या बोलण्यात वाद हावुन मोठा भाऊ म्हणुन येागेशनेही तिच्यावर हात उगारात थाप मारली. याचा राग येवून..मी तुला बाहेरच्या मुलांकडून मार खाऊ घालीन अशी धमकी तीने देऊन निघून गेली. योगेशही घराकडे निघाला असतांना गेंदालालमील ते दुधफेडरेशन रेाडवर ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी त्याला थांबवून काहीएक कारण नसतांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली त्यापैकी एकाने लोखंडी ब्लेडसारख्या धारदार पात्याने पाठीवर, खांद्यावर वार करुन जखमी केले. जखमी अवस्थेत योगेशने पेालिस ठाणे गाठून तक्रार दिल्यावर तीन आनोळखी तरुणांच्या विरुद्ध गुन्ह्याची नांद करण्यात आली आहे.

Protected Content