वादळी वाऱ्यामुळे इमारतीची भींत कोसळल्याने वृध्द जखमी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रविवारी ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात शहरातील शिरसोली रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भींत कोसळल्याने हॉटेलमधील वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी झालेल्या वृध्दाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरासह तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाने रविवारी ४ जून रोजी दुपारी १२ वाजता हजेरी लावली होती. शहरातील शिरसोली रोडवर बांधकाम सुरू असलेल्या पाच मजली इमारतीची भीत वादळीवाऱ्यामुळे कोसळली. इमारतीच्या बाजूला असलेल्या सप्तश्रृंगी भरीत सेंटर या हॉटेलवर भिंत पडली. यात हॉटेलमध्ये बसलेले सुप्रीम कॉलनी येथील रहिवाशी राजेंद्र सजनसिंग पाटील हे वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत वृध्दाला आकाशवाणी चौकातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेत इतर कोणतीही जीवीत हानी झालेली नाही परंतू हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे मेहरूण परिसरातील श्रीराम मंदीर संस्थानसमोरली जुने वडाच झाड कलंडले आहे. यात दोन घरांचे नुकसान झाले आहे. तर अजिंठा विश्रामगृह, रिंगरोड आणि नवीपेठ परिसरात काही ठिकाणी झाडे तुटून पडली आहे. त्यामुळे काही वेळी विजेचा प्रवाह खंडीत झाला होता.

Protected Content