सावद्यात संदल शरीफ मिरवणूकीचे आयोजन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील हजरत पिर मंजन शाह बाबा संदल शरीफ मिरवणूकीचे आयोजन बुधवारी ७ जुन रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आले आहे.

रावेर तालुकयातील सावदा येथील स्वामीनारायण नगर रोडवर असलेल्या हजरत पिर मंजन शाह बाबा संदल शरीफ मिरवणूकीचे आयोजन बुधवार ७ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे हिंदू व मुस्लिम बांधवांचे एकोप्याचे दर्शन घडते. दरम्यान कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी हजरत पिरमंजन शाह बाबाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content