फैजपूर श्रीराम सार्वजनिक जन्मोत्सव समिती तर्फे भव्य मिरवणूक

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । श्री रामनवमी निमित्त फैजपूर श्री राम सार्वजनिक जन्म उत्सव समितीने सजवलेल्या ट्रॅक्टरमधून श्री राम, लक्ष्मण, सीता आणि बजरंग बली यांच्या मूर्तींची शिवाजी नगर येथून मिरवणूक काढली.

सदर मंत्रोउपचार गुणवंत जोशी यांनी केले मूर्तीचे पूजन महंत कन्हैया महाराज राम मंदिर अमोदे, पवन महाराज, भगवानदास महाराज, खंडोबा देवस्थान फैजपूर, डिगंबर महाराज शनी मंदिर वाघोदे या महंतांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष निलेश राणे, यांच्या हस्ते नारळ फोडून जल्लोषात मिरवणुकीला सुरुवात झाली.तसेच गावातील श्रीराम मंदिरा जवळ सायंकाळी 7 वाजता महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष महानंदा होले, कल्पना कुवर हैद्राबाद, भा.ज.पा.शहराध्यक्ष अनंता नेहेते, संदीप भारंबे, अनिरुद्ध सरोदे, पिंटू तेली, संजय रल, दीपक होले, विपुल कासार, विनोद कोल्हे, युवराज किरंगे, संजय नारखेडे, विक्की जयस्वाल, लोकेश कोल्हे, भरत कोल्हे, रितेश चौधरी, नीरज झोपे, योगेश कोल्हे, श्याम चौधरी, रामा होले, मनोज सराफ, डोलेश चौधरी, तुकाराम बोरोले, सूरज गाजरे, जय श्रीराम ग्रुप सह शहरातील श्रीराम भक्तांची उपस्थिती होती. पूजन झाल्यावर शिवाजी नगरातून जल्लोषात मिरवणूक निघाली जय श्रीरामाचा जयघोष देत भाविक भक्तांनी आनंद लुटला दुसऱ्या बग्गीत सजीव देखाव्यात श्रीराम, लक्ष्मण,सिता यांच्या सजीव देखाव्यामनी सर्व भाविकांचे लक्ष वेधले. भगवान होले, राहुल साळी, राजू चौधरी यांनी संजीव सोंगे देखाव्यात सजवली होती. म्युझिकल बँड, ध्वज, घोडेस्वार, छावा मर्दिनी खेळ आखाडा फैजपूर यांचाही सहभाग होता. या कामी ए.पी.आय. सिद्धेश्ववर आखेगावकर सह पोलीस स्टॅफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

फैजपूर शहरात सकाळपासून गीतरामायण, कीर्तन, प्रवचन ही सुरू होते. या वेळीही अनेक भाविक भक्तांचा ठीक ठिकाणी सहभाग होता.

 

Protected Content