जिल्हाधिकार्‍यांनी बांधावर जाऊन केली पीक पाहणी

धरणगाव प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांसह थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली.

याबाबत वृत्त असे की, महसूल विभाग राबवित असलेल्या ई पीक पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत  यांनी तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील शेतकर्‍याच्या बांधावर पोहुचन त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अधिकारी राऊत म्हणाले की ई पीक पाहणी कार्यक्रम असं अत्यंत महत्त्वाचा व शेतकर्‍यांच्या हिताचा कार्यक्रम महसूल विभाग राबवीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभाग चांगली कामगिरी करीत आहे. यासाठी तलाठी कोतवाल मंडल अधिकारी चांगली कामगिरी करीत आहे तसेच शेतकर्‍यांमध्ये चांगल्याप्रकारे जनजागृती केल्यामुळे व त्यांच्यावर असलेल्या परिवेक्षक यांमुळे जिल्ह्यात ३३ टक्के खातेदारांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील आठ लाखाहून जास्त खातेदारांनी नोंदणी झाली आहे राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहेत ई पीक नोंदणीसाठी तीस तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे शेतकर्‍यांनी तंत्र समजून घेतल्यास भविष्यात शासन जे उपक्रम राबविले त्यामध्ये शेतकर्‍यांना सहभागी होता येईल याचा फायदा शेतकर्‍यांना होईल.

या ई पीक नोंदणीचा फायदा शेतकर्‍यांना होईल जी परिस्थिती क्षेत्रात किंवा शेतात आहे तीच उतार असणे अपेक्षित आहेतर गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी ची परिस्थिती आहे. शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरले आहे त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या ठिकाणी जाऊन तात्काळ पंचनामे करण्यात येत आहे हे सर्व अहवाल शासनाला पाठवण्यात आले आहे शेतकर्‍यांना या वेळी जिल्हाधिकारी यांनी आव्हान केले की शेतकर्‍यांसाठी हे अडचणीचे प्रसंग असून शेतकर्‍यांना तात्काळ मदत करावी व मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून ती मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे नियोजन करू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.ई पीक साठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक या गावात थेट शेतकर्‍यांच्या बांधावर गेले होते यावेळी त्यांनी ई पीक पाहणी करून शेतकर्‍यांची इ पीक नोंदणी बाकी होती ती करून घेतली.यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत याचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रांत विनायक गोसावी,तहसीलदार नितींकुमार देवरे ,तलाठी आरिफ शेख मंडलाधिकारी बाविस्कर ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Protected Content